कामगारांचा संपाचा इशारा..!

३ फेब्रुवारी रोजी संघटनेतर्फे एक दिवस धरणे तर २४ फेब्रुवारीपासून सर्व कर्मचारी बेमुदत संप पुकारणार आहेत...

कामगारांचा संपाचा इशारा..!

विजय कुलकर्णी/परभणी : सफाई कर्मचारी व मनपातील कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य नगर परिषद, नगर पंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना संलग्नीत परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनास सादर करावा, महापालिकेतील मंजूर आकृतीबंधातील रिक्त पदांवर शैक्षणीक पात्रतेप्रमाणे कर्मचा-यांचे समावेशन करण्यात यावे. कर्मचा-यांचे वेतन दरमहा सात तारखेला करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी संघटनेतर्फे एक दिवस धरणे तर २४ फेब्रुवारीपासून सर्व कर्मचारी बेमुदत संप पुकारणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.