परभणी: सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या तरुणाने सायंकाळच्या सुमारास त्याच्याकडून पैसे उकळणार्या एका इसमाच्या नावाचा उल्लेख करत मी सोडून जात आहे. असे म्हणत विष प्राशन केले होते.
सेलू तालुक्यातील डिग्रस वाडी येथील एका तरुणाने गुुरूवार दि. २८ जानेवारी रोजी सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बालकृष्ण सुंदर लेवडे (वय२२) असे या युवकाचे नाव आहे. या तरुणाने सायंकाळच्या सुमारास त्याच्याकडून पैसे उकळणार्या एका इसमाच्या नावाचा उल्लेख करत मी सोडून जात आहे, असे म्हणत विष प्राशन केले. त्यानंतर या युवकास उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणीतील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अनेकबाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अथवा नाही, हे समजू शकले नाही.