विजय देशमुख/निटूर : लातूर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी आज निलंगा तालूक्यातील पानचिंचोली , मुगाव , निटूर या गावांना भेटी दिल्या. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालूका आरोग्य अधिकारी कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे , लघू पाठबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेलार, गटशिक्षण अधिकारी स्वामी निटूरचे उपसरपंच संगमेश्वर करंजे उपस्थित होते.
पानचिंचोली , मुगाव, निटूर या गावामध्ये पाहणी करून संबधीतांना मार्गदर्शक सुचना केल्या. तसेच बाला उपक्रमामध्ये मुगावची जि. प. शाळा समाविष्ट झाल्याने गोयल यांनी शाळेची पाहणी केली. तसेच गावातील विकास कामाची पाहणी केली .
त्यानंतर गोयल यांनी निटूरच्या प्रा. आरोग्य केंद्रामध्ये भेट देऊन आरोग्य केंद्राची बारकाईने पाहणी करत आवश्यक सुचना ही केल्या. त्यांनी लोकांच्या अडचणी ही जाणून घेतल्या. अचानक आलेल्या या दौ-याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. पानचिंचोली येथे ही त्यांनी विकासकामाची पाहणी केली. तसेच जि. प. च्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सुचना केल्या.
शेवटी गोयल यांनी कोरोना काळामध्ये ज्या महीला कर्मचा-यांनी सेवा बजावली अशा महिला कर्मचाऱ्यांना तिळगूळ देवून कौतुक केले.