माधव पिटले/निलंगा: गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना लोकांनी डावलले परंतू अंबुलगा जि.प.गटातील ८ पैकी ८ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावत जिल्हा परिषद उपाध्याक्षानी गड राखला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती,मात्र लातूर जिल्ह्यातील अंबुलगा बु हे एकमेव असे जिल्हा परिषद गट आहे तेथील सर्वच ग्रामपंचायती या भाजपाच्या ताब्यात आहेत. विद्यमान जि.प.उपाध्यक्षा भारतबाई दगडू सोळुंके यानी विकास कामाच्या माध्यमातून व सतत जनसंपर्क ठेवत आपला गाड राखला आहे.गटातटाचे राजकारण बाजूला सारून त्यानी १९ गावात आरोग्य शिक्षण क्रीडा दलित वस्ती यातून गटातील अंबुलगा बु सावगीरा जाजनूर झरी शिऊर आनंदवाडी वळसांगवी गिरकचाळ राठोडा बोटकुळ आंबेवाडी नदीवाडी हंचनाळ गुराळ केळगाव काटेजवळगा केदारपूर अनेक विकास कामे केली आहेत.
तसेच ज्या रस्त्यांची अनेक वर्षापासून मागणी होती ती पूर्ण करून एक वेगळा पॕटर्न राबवला आहे.शाळा दुरूस्ती शाळेची नवीन इमारती शेत रस्ते दलित वस्तीमधील सिमेंट रस्ते सभागृह गावातील मुख्य रस्ते आरओ पाणी सौर उर्जा महिलांना शिलाई मशीन वाटप शेळी गट दुधाळ जणावरे विहिरी गरीबांच्या मुलींच्या लग्न कार्यात केलेली आर्थिक मदत अशा अनेक योजनेतून व माध्यमातून जि.प.गटातील गावांना नंदनवन करण्याचे काम यांच्या माध्यमातून व विकास निधीतून झाले आहेत.
गेल्या ग्रामपंचायत निवडकीत ज्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात होत्या. त्या सुध्दा भाजपाकडे खेचून आणण्याचे काम जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी केले आहे. चार वर्षात १९ गावा पैकी एकही गाव असे नाही की तिथे विकास निधी पोहचला नाही. अंबुलगा बु सारख्या मोठ्या गावात त्यानी ३ कोटी ५० लाख रूपये देऊन गावात अनेक विकास कामे केली आहेत. विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर राज्याचे कॕबिनेट मंत्री असताना त्यांनी आपल्या एक निष्ठेने गटातील १९ गावात कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणला व ती कामे चांगल्या दर्जाची करून विकासाचा नवीन पॕटर्न राबविला आहे. याचेच फलित गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत दिसून आले व ८ पैकी ८ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. अरविंद पाटील निलंगेकर यांच्या चोख नियोजनाचे तंतोतंत पालन करत विकासाची गती कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना लोकांनी ग्रामपंचायत निवडणूकीत नाकारले परंतु उपाध्यक्षाच्या कामाची पावती म्हणून त्याना स्वीकारले असे जाणकार लोकांमध्ये चर्चा आहे.