ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

आशा पारेख म्हणाल्या,”राष्ट्रपतींच्या हस्ते मला दादासाहेब फाळके पुरस्कार’ वयाच्या ८८ वर्षी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आभार. नवोदित कलाकारांना चांगलं काम करण्याचा, शिस्तीत राहण्याचा आणि कितीही गगनभरारी घेतली तरी जमिनीवर राहण्याचा मी सल्ला देत आहे.

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. १९५४ साली या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे. तर ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदा आशा पारेख यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Share