राजकीय बंड कि आज्ञापालन …!?

अजित पवार काही आमदारांसह शिंदे -भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यापासून चालू असलेली चर्चा अखेर खरी ठरली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षात तिसरा महाभूकंप झाला. राष्ट्रवादी पक्ष फोडत दादांनी ९ आमदारांसह थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली . यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे ,धर्मराव आत्राम ,आदिती तटकरे , संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली .

या दादांच्या निर्णयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे . अनेक राजकीय मंडळींकडून सुचेल त्या समर्पक अश्या टिप्पण्या करण्यात येत आहेत .मात्र या घटनेननंतर राज्याचे राजकारणीय समीकरणे कशी बदलतात , निर्णयामागचे मुख्य सूत्रधार , कारणे येणारा काळचं सांगेल .

Share