एक लाख रुपयांच्या दारूसह अँटो जप्त

1 min read

एक लाख रुपयांच्या दारूसह अँटो जप्त

लॉकडाऊनची घोषणा अन् दारूची साठवणूक, गुन्हे शाखेची कारवाई

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: जिल्हयात 6 ते 19 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.याच पार्श्वभूमीवर अवैध दारूसाठा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळताच पथकाकडून यासंदर्भात शोध मोहीम करण्यात आली. मंगळवारी पथकाने तीन आरोपींकडून एक लाख चार हजार रुपयांच्या अवैध दारूसह एक अँटो जप्त करण्यात आला आहे.
हिंगोलीतील कळमनुरी मार्गावरील सावरखेडा शिवारात विदेशी दारू अवैधरित्या अँटो मधून वाहतूक केल्या जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. सदर तपासणी केली असता अँटो मध्ये 70 हजार रुपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी शेख इक्बाल शेख हमीद, शेख चांद शेख करीम, राजू लक्ष्मण सुरोशे राहणार कळमनुरी या तिघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सदर तीन आरोपींसह त्यांनी दारू विकत घेतलेल्या बगडिया वाईन शॉपीच्या चालकांविरुद्ध व चालकाच्या व्यवस्थापका विरुद्ध बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे, शंकर जाधव, विलास सोनवणे, भगवान आडे, राजू सिंग, आशिष उंबरकर, भगवान काळे आदींनी सहभाग नोंदविला.