दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलल्या-वर्षा गायकवाड

राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलल्या-वर्षा गायकवाड

मुंबईःराज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतल आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा असे आवाहन त्यांनीा केला आहे.

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.