भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार- यशवंत जाधव

डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंप?

भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार- यशवंत जाधव

मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनिती आखतायत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. डिसेंबर महिन्यात भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना – ९७
भाजप – ८३
काँग्रेस – २९
राष्ट्रवादी – ८
समाजवादी पक्ष – ६
मनसे – १
इतर – २


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.