पावसाळी अधिवेशन, 23 खासदार कोरोना बाधित.

1 min read

पावसाळी अधिवेशन, 23 खासदार कोरोना बाधित.

लोकसभेतील 17 खासदार आणि राज्यसभेतील 6 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह लोकसभेतील  17 खासदार आणि राज्यसभेतील 6 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सुखबीर सिंह (भाजप), हनुमान बेनीवाल (आरएलपी), मीनाक्षी लेखी (भाजप), सुकांता मजूमदार (भाजप), अनंत हेगड़े (भाजप), जी माधवी (वाईआरएससी), प्रताप राव जाधव (शिवसेना), जनार्दन सिंह सिग्रीवाल (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप), प्रघान बरुआ (भाजप), एन रेडेप्पा (वाईआरएससी), सेल्वम जी (डीएमके), प्रताप राव पाटील (भाजप), रामशंकर कठेरिया (भाजप), प्रवेश साहिब सिंह (भाजप), सत्यपाल सिंह (भाजप) आणि रोडमल नागर (भाजप) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचं संकट असतानाही 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगनुसार खासदारांची बैठक व्यवस्था, दोन रांगांमध्ये काचांचे आवरण अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या. खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे आवरणही लावण्यात आले आहे. एवढंच नाही तर उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचे म्हणणे मांडायचे आहे.