पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घेण्यात आला निर्णय...

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

औरंगाबाद: राज्यातील शाळांमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील अध्यादेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला आहे. या निर्णयामुळे कोरोना काळात सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना संकटास सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये सुध्दा ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.