गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार, तर पोलिस गंभीर जखमी

नक्षली म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे ठार

गडचिरोलीत  २६ नक्षलवादी ठार, तर पोलिस गंभीर जखमी

गडचिरोली- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मोठ यश आलं आहे.या कारवाई दरम्यान चार पोलिस गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेत त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.राज्याच्या इतिहासात नक्षलवाद विरोधातील हि सर्वात मोठी कारवाई समजली जाते.

सी-६० पोलीसांच्या पथकाने नक्षलविरोधी मोहीम राबवीत असतांना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.त्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक मोठा नक्षलवादी ठार झाला आहे. चकमकीत अनेक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची जंगलातील शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी म्होरक्या-

सी-६० पोलिस पथकाच्या कारवाईत नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचा मृत्यू झाला आहे.तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून त्याने ३२ वर्षांपूर्वी चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.