रायगड दरड दुर्घटनेत आतापर्यत ४४ जणांचा मृत्यू

किमान ५० जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली.

रायगड दरड दुर्घटनेत आतापर्यत ४४ जणांचा मृत्यू

महाडः राज्यभरात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात महाड व पोलादपूरसह तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत दोन ठिकाणी दरडीच्या ढिगाऱ्यांखालून ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

महाड तालुक्यातील तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, दरड दुर्घटनेतील व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, एनडीआरएफ , एसडीआरएफ , कोस्टगार्ड, नेव्ही यांच्या प्रत्येकी दोन टीम घटनास्थळी रवाना, स्थानिक १२ रेस्क्यू टीम रवाना, बसच्या मदतीने अत्यावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. दरड कोसळून जखमी झालेल्या ३५ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. एका ठिकाणी बचावकार्य अजूनही सुरूच असून किमान ५० जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.