देशात गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

देशातील कोरोनाचा मृत्यूदर १.३० टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास ९६ टक्के

देशात गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी देशात ५० हजार ८४८ नवीन कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या २४ तासात १ हजार ३५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यृ झाला आहे. देशात ६८ हजार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील कोरोनाचा मृत्यूदर १.३० टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास ९६ टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन ३ टक्क्यांहून कमी झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांची एकुण आकडेवाडी

एकुण रुग्ण : ३,००,२८,७०९

एकुण डिस्चार्ज : २,८९,९४,८५५

एकुण मुत्यु : ३,९०,६६०

एकुण अॅक्टिव्ह रुग्ण : ६,४३,१९४

आतापर्यत लसीकरण झालेली संख्या : २९,४६,३९,५११


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.