५५ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

१० जणांना कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज देण्यात आला. तर एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

५५ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

विजय कुलकर्णी/परभणी :  शहरासह जिल्ह्यात आज  सायंकाळी सात वाजेपर्यंत ५५ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. तर १० जणांना कोरोनामुक्त होऊन  डिस्चार्ज देण्यात आला. तर एका कोरोनाबाधितचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयातील कक्षात २४९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ३२२ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार ३७४ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ७ हजार ८०३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख २१ हजार ९२६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख १२ हजार ९९९ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार २१८ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५६९ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.