मूळव्याधीचा त्रास कमी करणार्‍या ६ फायदेशीर टीप्स

मूळव्याधीचा त्रास कमी करणार्‍या ६ फायदेशीर टीप्स

मूळव्याधीचा त्रास हा वेदनादायी आणि इम्बॅरेसिंग असल्याने त्याबद्दल खुलेपणाने फारसे बोलले जात नाही. खाण्या-पिण्याच्या हानीकारक सवयींमुळे मूळव्याधीचा त्रास अचानक जाणवतो आणि अल्पावधीतच त्रासदायक होऊन जातो. शौचाच्या वेळेस तीव्र वेदना होण्यासोबतचरक्त पडण्याची समस्या वेळीच उपचार न केल्यास अधिक गंंभीर होऊ शकते. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा त्रास सुरवातीच्या टप्प्यांत असल्यास या घरगुती उपयांंनी त्याचा त्रास कमी करा.

१.टॉयलेटमध्ये टाईमपास करू नका:

विनाकारण टॉयलेटमध्ये जाऊन पेपर वाचत शौच येण्याची वाट पाहत बसू नका. जेव्हा खरंच ती इच्छा होईल तेव्हा टॉयलेटमध्ये जा.

२.फायबरयुक्त पदार्थ अधिक खावेत :

मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहाराची निवड करावी. त्यासाठी फायबरयुक्त आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ अधिक खावेत. फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते. ओट्स,बार्ली, डाळी, पालेभाज्या तसेच संत्रासारखी सायट्र्स फळं यांचा आहारात समावेश करावा.

३.फायबर सप्लिमेंट्सची मदत घ्या :

तुमच्या आहारात फायाबरयुक्त पदार्थांचा समावेश होत नसल्यास फायबर्स सप्लिमेंट घ्यावेत. त्यामुळे 50% समस्या सुधारण्यास मदत होते असा क्लिनिकल रिसर्च आहे. त्यामुळे खाज येणे, वेदना कमी होण्यास मदत होते.

४.फ्लॅवॉनॉईड्सयुक्त पदार्थ खावेत :

ब्लॅकबेरीज, ब्ल्यूबेरीज, चेरी यासारखी सायट्रस फळं रक्तवाहिन्यांना मजबूत करते तसेच गुद्द्वाराला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. एका मेटा अ‍ॅनॅलिसिसनुसार मूळव्याधींंच्या लक्षणांमध्ये फ्लॅवॉनॉईड्सच्या सेवनामुळे 58% सुधारणा झाली. वेदना कमी होण्यासोबतच रक्त पडण्याची समस्यादेखील कमी झाली. 'बेरीज' आहारात ठेवा आणि आरोग्य सुधारा !

५.पेट्रोलियम जेली लावा :

मूळव्याधीचा त्रास असणार्‍यांंमध्ये अनेकजण शौचासाठी विशिष्ठ ताण लावतात. यामुळे वेदना वाढतात. तो त्रास कमी करण्यासाठी पेट्रोलियम जेलीसारखे ल्युब्रिकंट फायदेशीर ठरते. गुद्द्वाराच्या ठिकाणी थोडी पेट्रोलियम जेली लावावी.

६.भरपूर पाणी प्या:

फायबर्सच्या सोबत पचन सुधारण्यासाठी तसेच मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात पिणे गरजेचे आहे. अपुर्‍या पाण्यामुळे शौचाला कडक होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी, डिहायाड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी तसेच शौचाला साफ होण्यासाठी पाणी योग्य प्रमाणात पिणे फायदेशीर ठरते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.