६२ वर्षाच्या वृध्दाने २५ किलोमीटरचे अंतर सायकलने अडिच तासांत केले पार

1 min read

६२ वर्षाच्या वृध्दाने २५ किलोमीटरचे अंतर सायकलने अडिच तासांत केले पार

पीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी वृध्दाचा सायकलने ५० कि. मी. प्रवास

स्वप्नील कुमावत/अमरावती : नवीन पीक कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परंतु गावात एस. टी. बस येत नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी (मांडवगड) येथील ६२ वर्षीय वृध्दाने २५ कि. मी. अंतर सायकलने कापत तहसिल कार्यालय गाठले व काम करून परत सायकलने २५ कि. मी. अंतर पार करत गावाला पोहचले. वृध्दाने असे एकुण ५० किलोमीटर अंतर एकाच दिवशी सायकलने पार केल्याने अनेकांना आश्चर्यच वाटत आहे.

शेतीच्या कामाची लगबग सुरु असताना शेती कामाला लागणाऱ्या पैशासाठी कर्ज घेत असतात. शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सातबारा, शेतीचे कागदपत्र तहसिल कार्यालयातून 0काढावे लागतात. कोरोना मुळे गावातून तालुक्याला जाण्यासाठी बसची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रवास स्वतःच्या वाहनाने करावा लागत आहे. ज्यांच्या कडे गाडी नाही त्यांना मात्र सायकल किवां पायी प्रवास करवा लागतो आहे. अशातच एका आजोबांनी सायकल वरुन 50 किलो मिटरचे अंतर 5 तासात कापत गाव ते तालूका आणि तालूका ते गाव असा प्रवास केला.
गावातुन २५ किलोमीटरचे अंतर त्यांनी २.३० तासांत पार केले. व चांदूर रेल्वे तहसिलमध्ये काम आटोपल्यानंतर पुन्हा २५ किलोमीटर अंतर कापत घरी पोहचले. वृध्द असतांनाही ५० किलोमीटरचे अंतर ते ही जुन्या साध्या सायकलने यशस्वी कापल्याने अनेकजन आश्चर्य व्यक्त करीत आहे. असे असले तरी एस. टी. बस बंदचा फटका हा अनेकांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे.