निलंगा तालुक्यात ७७.६३% मतदान

४८ पैकी चार गावे बिनविरोध निघाल्यामुळे प्रत्यक्ष ४४ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली

निलंगा तालुक्यात ७७.६३% मतदान

माधल पिटले/ निलंगा : तालुक्यातील ४८ पैकी ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण ७७.६३% मतदान झाले असून ८५७ उमेदवारांचे नशीब पेटीत बंद झाले आहे. ४८ पैकी चार गावे बिनविरोध निघाल्यामुळे प्रत्यक्ष ४४ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया दि. १५ रोजी पार पडली आहे. यात ३५७ जागेसाठी ८५७ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी १६९ मतदान केंद्राची उभारणी केली होती.१६९ केंद्राध्यक्ष व ५ कर्मचाऱ्याची नियुक्ती यावेळी करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी नियुक्त केले होते.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर २ आरोग्य कर्मचारी याप्रमाणे ३३८ कर्मचारी मार्फत मतदाराची आरोग्य तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक मतदारांची तपासणी करूनच मतदान करण्यास पाठविले जात होते.

१३ क्षेत्रीय अधिकारी, तर निवडणुकीची वाहतूक करण्यासाठी खाजगी वाहनांची सोय करण्यात आली होती. ५० जीप, १५ टेम्पो ट्रॅव्हल्स ,७ मिनी ट्रॅव्हल्स ची व्यवस्था कर्मचाऱ्यांना करण्यात आली होती. ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात होसुर, उस्तुरी, बसपूर, कासार बालकुंदा ,सावरी, जाजनुर ,वाडीशेडोळ ,कासारशिरशी ,कोराळी, वळसांगवी, वाकसा, आनंदवाडी (अबू), लांबोटा, माळेगाव (जे), डोंगरगाव (हा) ,ढोबळेवाडी/ म्हसोबावाडी, हंद्राळ, टाकळी ,बुजरूगवाडी , मुदगड एकोजी, गौर ,अंबुलगा (मेन ),औराद शहाजानी, बामणी ,बडूर, केळगाव ,हाडगा, शिरोळ- वांजरवाडा, शिऊर ,कोकळगाव, ताडमुगळी ,नणंद, हासोरी (बु), खडकउमरगा, पिरुपटेलवाडी, माळेगाव( क), हंचनाळ, रामतीर्थ ,, ताजपुर, सरवडी तगरखेडा वांजरवाडा, आंबेवाडी- मसलगा. आदी गावांचा समावेश होता.

निलंगा तालुक्यातील डांगेवाडी, गुराळ, सिंगनाळ ,आनंदवाडी (गौर) या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. दि.१८ रोजी निलंगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे निकाल प्रक्रिया पार पडणार आहे.

निलंगा तालुक्यातील हासुरी येथे दोन गटात बाचाबाची झाली परंतु पोलिसांनी मध्यस्थी करून सदरील प्रकरण निवळले.हासुरी येथील प्रकार वगळता निलंगा तालुक्यातील कुठल्याच ग्रामपंचायत मध्ये कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही.
ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारानी मतदान केलेल्या सर्व पेट्या राञी उशीरा पर्यंत सर्व कर्मचारी आणण्याचे काम करत होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.