८ मार्चला महिला चालवणार पंतप्रधानांचे अकाउंट्स

1 min read

८ मार्चला महिला चालवणार पंतप्रधानांचे अकाउंट्स

जर आपण अशी स्ञी आहात ज्यांनी जीवनात प्रेरणादायक काम केले असेल तर त्या महिला आपली कहाणी शेयर करू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 8 मार्च रोजी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करीत असल्याचे ट्विट करून एक खळबळ उडवली होती. त्यांच्या या ट्विटमुळे पंतप्रधान काय करणार याबद्दल लोकांचा अंदाज होता, पण आता त्यांनी स्वत:हून ट्वीट केले आहे की, महिला दिनानिमित्त आपले सोशल मीडिया अकाउंट अशा स्ञियांवर सोपवायचे आहे ज्या स्त्रियांचे जीवन प्रेरणादायक आहे आणि त्यांनी जगासाठी एक चांगले काम केले आहे. पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, 'यामुळे मला लाखो लोकांना प्रेरणा देण्यास मदत मिळेल. तुम्ही अशा महिला आहात का? किंवा तुम्ही अशा प्रेरणादायक महिलांना ओळखतात का? असे असेल तर अशा कथा #SheInspiresUs चा वापर करून तुम्ही अपलोड करा.'

यासोबतच पंतप्रधान मोदींनी माहिती दिली आहे की,  हे खाते हाताळण्यासाठी त्यांच्या प्रेरणादायक कथेच्या आधारे महिलांची निवड केली जाईल. म्हणजेच, जर आपण अशी स्त्री आहात ज्यांनी जीवनात प्रेरणादायक काम केले असेल तर त्या महिला आपली कहाणी शेयर करू शकता. फेसबुकवर #SheInspiresUs सह पोस्ट करा. निवडलेल्या महिलांपैकी एका महिलेला ही संधी दिली जाईल.