२२ वर्षीय तरूणाची मध्यरात्री तलावात उडी मारुन आत्महत्या.

1 min read

२२ वर्षीय तरूणाची मध्यरात्री तलावात उडी मारुन आत्महत्या.

दत्तात्रय हा हैद्राबाद येथे काम करत होता. लॉकडाऊन मुळे गावी राहण्यासाठी आला होता. पुन्हा हैद्राबादला कामानिमित्त गेला होता.

एम.एस.हुलसूरकर/हुलसूर : हुलसूर तालुक्यातील बेलुर येथील दत्तात्रय मनोहर डिग्गी (वय२२) यांनी दि.१२ रोजी रात्री बेलुर येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
WhatsApp-Image-2020-10-13-at-10.15.15-PM
अधिक माहिती अशी की, दत्तात्रय हा थोडासा मानसिक त्रासात होता. हैद्राबाद येथे काम करत होता. लॉकडाऊन मुळे गावी राहण्यासाठी आला होता. पुन्हा हैद्राबादला कामानिमित्त गेला होता. दि.१२ रोजी गावाकडे आला व रात्री त्याने केव्हा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली याची माहिती नाही. अशी माहिती दत्तात्रय याची आई यांनी फिर्यादी मध्ये दिली आहे. दि.१३ रोजी घटना समजताच दुपारी हुलसूर पोलीस स्टेशनचे अधिकारी गौतम यांनी घटनास्थळी भेट दिली व तात्काळ तलावातील शव बाहेर काढण्यात आले. हुलसूर सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून नातेवाईकांना मृतदेह देण्यात आला. हुलसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे