मुंबईः प्रसिद्ध उद्योग पती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहे गुरूवारी रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलीसांच्या हाती एक महत्त्वाचे सीसीटिव्ही फुटेज लागले आहे. ज्या व्यक्तीने कार पार्क केली होती, तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे. त्याने मास्क घातला होता. तर डोके हुडीने झाकलेले होते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, ती कार काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी करण्यात आली होती.
हाजीआली जवळील एका ट्रॅफिक सिग्गनलवरचे हे सिसीटीव्ही फुटेज आहेत. ज्यात स्कार्पिओ गाडीमध्ये जिलेटिनच्या काड्या होत्या. या प्रकारणात ९ लोकांच्या चौकशी सुरू आहे, आणि २ लोकांची सखोल चौकशी सुरू आहे. यापैकी जवळपास सर्वजण या घटनेचे साक्षीदार आहेत. कारचा मालक कोण आहे, याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईत ज्या-ज्या ठिकाणांहून कार गेली आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. याआधी कुणीही अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारा कॉल किंवा पत्र पाठवलेले नाही. कारमध्ये मिळालेल्या स्फोटकांच्या बाबत पोलिसांनी सांगितले की, या मिलिट्री ग्रेड जिलेटिन नाहीत. सापडलेल्या जिलेटिन या सर्वसाधारणपणे बांधकाम साइटवर खोदकामासाठी वापरल्या जातात.