औरंगाबाद शहरातील पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

शहरातील १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या...

औरंगाबाद शहरातील पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

औरंगाबाद: राज्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर आता शहर पोलीस दलातही पोलीस निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी शुक्रवारी रात्री उशीरा १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

अशी आहे नवीन नेमणूक

  • वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली एमायडीसी वाळूज येथे.

  • सिटी चौकचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांची बदली सिडको येथे

  • सिडकोचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची बदली सिटी चौक येथे.

  • छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांची बदली मुकुंदवाडी येथे.

  • मुकुंदवाडीचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांची बदली छावणी येथे.

  • हर्सूलचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांची बदली वाळूज येथे.

  • बेगमपुरा चे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची बदली वेदांत नगर येथे.

  • वेदांत नगर चे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची बदली सुरक्षा शाखेत

  • सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची बदली उस्मानपुरा येथे.

  • उस्मानपुराचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांची बदली अर्ज चौकशी शाखेत.

  • क्रांती चौकचे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांची बदली हर्सूल येथे.

  • एमआयडीसी वाळूजचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांची बदली बेगमपुरा येथे.

  • छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची बदली पुंडलिक नगर येथे.

  • राज्य गुप्तवार्ता विभागातून हजर झालेले पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांची नेमणूक दुय्यम निरीक्षक म्हणून मुकुंदवाडी येथे.

औरंगाबादेतून अपहरण केलेल्या चिमुकलीची जालन्यातून सुटका
सिडको एमआयडीसी पोलीसांची कामगिरी, आरोपी सासू-सुनेला अटक...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.