विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तीस 
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश

1 min read

विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तीस राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश

कुटुंबीयातील व्यक्तीस 4 लाख रुपयाचा मदत धनादेश विद्युत वितरण कंपनीमार्फत राज्याचे संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सूपूर्द करण्यात आला.

लातूर - बामणी (तालुका उदगीर) येथे विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या राऊबाई रामकिशन मेहत्रे वय 12 वर्षे यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीस 4 लाख रुपयाचा मदत धनादेश विद्युत वितरण कंपनीमार्फत राज्याचे संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सूपूर्द करण्यात आला.
या धनादेश सूपूर्द वेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेटी, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, विद्युत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील व जिल्हा परिषद सदस्य कल्याण पाटील उपस्थित होते.