जिओ विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा

1 min read

जिओ विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा

सर्वसामान्य लोकांना मोठ मोठी आश्वासने देऊन त्यांच्याकडून आर्थिक रक्कम लाटत सर्वसामान्यांची फसवणूक करण्यात येत आहे.यामुळे जिओ कंपनीच्या सोनपेठ येथील कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा.

सिद्धेश्वर गिरी/सोनपेठ: मागील अनेक दिवसांपासून रिलायन्स या आघाडीच्या कंपनीने सर्वच क्षेत्रात आपले पाऊल टाकलेले आहे. याच अनुषंगाने मोबाईल फोनच्या क्षेत्रातही जिओने आपले पाऊल टाकत संगणकीय प्रणालीला हातभार लावण्याच्या अनुषंगाने सर्वसामान्यांना माफक दरामध्ये मोबाईल फोन यासह इंटरनेट देण्याचा मानस या कंपनीच्या माध्यमातून सुरु झालेला आहे.
मात्र सर्वसामान्य लोकांना मोठ मोठी आश्वासने देऊन त्यांच्याकडून आर्थिक रक्कम लाटत सर्वसामान्यांची फसवणूक करण्यात येत आहे.यामुळे जिओ कंपनीच्या सोनपेठ येथील कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा विटा खुर्द येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की, विटा,लासिना,वाघलगाव,परिसरात जिओ कंपनीचे नेटवर्क नसल्याने सध्या ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग बुडत आहेत
यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून. यासाठी जिओ कंपनीने विटा खुर्द या परिसरात नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करावी.
अन्यथा सोनपेठ येथील कार्यालयास कुलूप ठोकणारा असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर भास्कर भोसले,योगेश भोरे,सुनील कोलते,प्रदीप भोसले,अनुरुद्ध भोसले,गजानन कोलते,शुभम भोसले,गणेश बदाले यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.