शेतात शेळ्या सोडल्याच्या वादवरुन एकास बेदम मारहाण

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट

शेतात शेळ्या सोडल्याच्या वादवरुन एकास बेदम मारहाण

निलंगाः शेतात शेळ्या का सोडल्या? असा सवाल विचारत चौघा भावांनी एका मेंढपाळाला कु-हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली.या घटनेत मेंढपाळाला गंभीर दुखापत झाली आहे.कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पिडिताने केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील कोकळगाववाडी येथील कुमार संभाजी कामले हे आपल्या शेळ्या घेऊन आरोपीच्या शेताशेजारी पाणी पाजवण्यासाठी जात असताना माझ्या शेतात शेळ्या का सोडता? असं म्हणत दत्तू लिंबाजी कामले, ज्ञानेश्वर शिवाजी कामले, शाहू लिंबाजी कामले, विजय शिवाजी कामले या चार भावांनी फिर्यादीला कु-हाडीच्या तुंब्याने व काठीने मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे.सदरील व्यक्तीच्या डोक्यात मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे तसेच उजव्या हाताचे बोटे मार लागल्याने फुटली आहेत.तसंच पायावरही मार लागल्याने मोठी दुखापत झाली आहे.जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीने सदरील व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले आहे.एवढी मोठी गंभीर मारहाण करूनही सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत.पोलिस संबंधित आरोपीस अटक का करत नाहीत? असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

पोलिसांना पैसे दिल्याने आरोपींना अटक होत नाही असा आरोप मेंढपाळाने केला आहे.घटना होऊन तीन दिवस झाले तरी अजूनही अटक न झाल्याने शिरसी पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपथित केले जात आहे. गंभीर दुखापत झालेले कुमार कामले यांना पोलिस न्याय देत नसल्याने त्यांनी माध्यमांशी संपर्क साधुन न्यायाची मागणी केली आहे. कर्तवदक्ष लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक निखील पिंगळे तरी न्याय देतील का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.