माझ्या  वडिलांना शिवी का दिली,  म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांची बेदम मारहाण.

1 min read

माझ्या वडिलांना शिवी का दिली, म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांची बेदम मारहाण.

नेताजी जगताप या पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांच्या जमावाने काठीने व लाथाबुक्क्यांने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विजकुमार स्वामी /बेलकुंड : तु माझ्या वडिलांना शिव्या का दिलास म्हणून माळकोंडजी (ता. औसा) येथील एका पोलीस कर्मचाऱ्यास पाच जणांच्या जमावाने काठीने व लाथाबुक्क्यांने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गावातील एका दुकानासमोर नेताजी बाबुराव जगताप (वय २७) उभारले असता. इंद्रजित मगरसह समाधान मगर, रणजित मगर, अमर कदम व ज्ञानेश्वर कदम यांनी नेताजी जगताप याला, तु शिव्या का दिलास म्हणून शिविगाळ करीत लाथा बुक्क्यांने मारहाण केली. यावेळी रणजित मगर व समाधान मगर यांनी नेताजी जगताप यांच्या डोक्यात खांद्यावर व पायावर काठीने मारहाण करून जखमी केले.

तर रणजित मगर यांनी जगताप यांच्या खिशातील रोख ४५ हजार २०० रूपये जबरदस्तीने हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. नेताजी जगताप यांच्या खांद्याला जबर मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथे दाखल केले होते. याप्रकरणी नेताजी जगताप यांच्या फिर्यादीवरून इंद्रजित मगर, समाधान मगर, रणजित मगर, अमर कदम व ज्ञानेश्वर कदम यांच्या विरोधात किल्लारी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर १४७/२०, कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२७, ३२४, २२३, ५०४, ५०६, भा.दं.वि. १३५ कलम नुकसान गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे करीत आहेत.किल्लारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात बोकाळली असून. यामधून गावागावात भांडणे वाढली आहेत.याकडे स्थानिक पोलीसाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.या वाढलेल्या अवैध दारूविक्री विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.