घाटीतील महिला डॉक्टरच्या  गळ्याला चाकू  लावणारा, पोलिसांच्या ताब्यात.

1 min read

घाटीतील महिला डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावणारा, पोलिसांच्या ताब्यात.

काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी घाटीतील महिला डॉक्टर ड्यूटीवर जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून गळ्याला चाकु लावीत गवतात ओढ़त नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिला डॉक्टरने आरडाओरड केल्याने दोघे आरोपी पळून गेले होते.

सुमित दंडुके/औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी घाटीतील महिला डॉक्टर ड्यूटीवर जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून गळ्याला चाकु लावीत गवतात ओढ़त नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिला डॉक्टरने आरडाओरड केल्याने दोघे आरोपी पळून गेले होते.
या घटनेनंतर संपूर्ण घाटी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागे झाले होते. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरूद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गुन्हेशाखा या दोन आरोपींचा शोध घेत होते. अखेर घाटी परीसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे पाळत ठेवून एका आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. सागर हिम्मतराव दाभाडे (वय.२५, रा.गुलाबवाडी, टाऊन हॉल) याला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चौकशी केली असता साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. सध्या त्याला पुढील चौकशीसाठी बेगमपुरा पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे. दोन्ही आरोपी हे कायम नशेत असतात अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे.