मुसळधार पावसात उघड्या ड्रेनेजमध्ये पडला तरुण, थोडक्यात वाचला जीव

२० फुट पुढे असलेल्या दुसऱ्या चेंबरमधुन सुखरुप काढले बाहेर...

मुसळधार पावसात उघड्या ड्रेनेजमध्ये पडला तरुण, थोडक्यात वाचला जीव

औरंगाबाद : शहरात रविवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने उघड्या ड्रेनेजमध्ये एक तरुण पडला. दैव बलवत्तर म्हणून परिसरातील नागरिकांनी बघितले आणि तात्काळ त्याला २० फुट पुढे असलेल्या दुसऱ्या चेंबरमधुन सुखरुप बाहेर काढले.

जय भवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. जय भवानीनगर चौकात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते. अनेक वर्षांपासुन हा प्रश्न कायम आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. यामुळे मुख्य रस्त्यावरील उघडे ड्रेनेज पाण्यात बुडाले. याच भागात राहणारा मोरेश प्रकाश सुळे हा तरुण पायी जात असताना अचानक या उघड्या चेंबरमध्ये पडला. हे दृश्य परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांनी पाहीले. त्यांनी आरडाओरड करुन २० फुट पुढे असलेल्या दुसऱ्या चेंबरमधुन त्याला बाहेर काढले. नशीब चांगले म्हणून हा तरुण थोडक्यात बचावला.

काल परिसरातील नागरिकांनी या तरुणाला बघितले नसते तर त्याचा जीव गेला असता. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या रस्त्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी येथील नागरीक करीत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.