आकार माझा वेगळा...

1 min read

आकार माझा वेगळा...

१९१० मध्ये जेव्हा जिलेट कंपनीने पहिला ब्लेड लॉन्च केला तेव्हा ते दुहेरी ब्लेड असायचे.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण ब्लेडचा वापर तर करतोच. जसे नखे कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी परंतू कधी हा विचार कुणाच्या डोक्यात आला आहे की, एवढीशी धारदार ही ब्लेड याचा आकार असा का असेल? चला तर आज जाणून घेऊया ब्लेडची खरी कहाणी.

१९१०  मध्ये जेव्हा जिलेट कंपनीने पहिला ब्लेड लॉन्च केला तेव्हा ते दुहेरी ब्लेड असायचे. त्यावेळी हे पेटंट फक्त जिलेटकडे होते. २५ वर्षानंतर जेव्हा हे पेटंट कालबाह्य झाले तेव्हा बरयाच कंपन्यांनी अशा ब्लेड तयार करण्यास सुरवात केली.

रेजरदेखील त्यावेळी जिलेट कंपनीशी संबंधित असायचा, म्हणूनच सर्व कंपन्यांनी जिलेटच्या डिझाइनचे ब्लेड बनवायला सुरुवात केली आणि नंतर हा ट्रेंड बनला. हे दूर करण्यासाठी जिलेटने आपल्या वस्तरामध्ये बरेच बदल केले पण इतर कंपन्यांनीही त्यानुसार ब्लेडमध्ये बदल केले.

ब्लेड देखील इतका पातळ केला गेला कारण जर त्याला मध्यभागी या आकाराचे डिझाइन दिले नाही तर ते हलके वापरले तरीही तुटू शकेल. त्यामुळे त्यात लवचिकता टिकून राहण्यासाठी त्याला अशा प्रकारे आकार देण्यात आला होता.