अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी करार करावा – देवेंद्र फडणवीस

1 min read

अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी करार करावा – देवेंद्र फडणवीस

अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत मुख्यमंत्रीस्तरिय बैठक घेऊन पूरपरिस्थिती येऊ नये यासाठी तसेच आपातकालिन स्थिती उद्भल्यास पाण्याचा विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करावा - देवेंद्र फडणवीस

मुंबईः मागील वर्षी सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरामध्ये पूर आला होता. तेव्हा कर्नाटक सरकारणे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास नकार दिला होता. नंतर सरकारने त्यांच्याशी फार काळ पाठपुरवठा केल्यानंतर त्यांनी धरणातून पाणी सोडलं. अशी परस्थिती पुन्हा निर्माण होवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकार सोबत संयुक्त करार करावा. असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली.

यावर्षी आपल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. हवामान विभागाने यंदा 95 ते 104 टक्के इतके पर्जन्यमान असेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारसोबत आताच संयुक्त योजना तयार करणे आवश्यक असून, त्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक होणे गरजेचे आहे. असे त्यांनी पत्रामध्ये म्हणले आहे.

मागील पुराच्यावेळी लक्षात आले की, आपल्या धरणाच्या विसर्गात विविध छोट्या-मोठ्या नद्यांचे पाणी येऊन मिळते आणि पुढे अमलट्टी धरणामुळे हे पाणी अडल्याने महाराष्ट्राची पाण्याची पातळी वाढून मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते. असा वेळी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढविणे, हाच पर्याय ठरतो. मात्र, अलमट्टीचा विसर्ग एका क्षमतेपेक्षा जास्त वाढविला की कर्नाटकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यास ते अनुकूल नसतात व त्यासाठी फार पाठपुरावा करावा लागतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या धरणात पाणी उपलब्धता चांगली असल्याने कर्नाटकला वेळेआधी आणि अधिक विसर्ग करावा लागला तर महाराष्ट्र त्याची भरपाई देखील करून देऊ शकेल इतके अतिरिक्त पाणी आज आपल्याकडे आहे. सरकारने विविध तज्ञांना योग्य वाटेल, ती कार्ययोजना तयार करून दोन्ही मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता द्यावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. असे पत्रात म्हटले आहे.
Eay8H9ZUcAA163c-2

Eay8H9pUEAQV2i7-1