आमदारांनीच लावला फिरस्त्यांच्या तोंडाला मास्क.

1 min read

आमदारांनीच लावला फिरस्त्यांच्या तोंडाला मास्क.

ज्या नागरीकांच्या तोंडाला मास्क नाही अशाना आमदार अंबादास दानवेंनी स्वत: मास्क लावला.

सुमित दंडुके/औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहीमे अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरातील विविध चौका-चौकात शिवसैनिकांच्या मार्फत विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांना मास्क भेट देऊन वाटप करण्यात आले. तसेच यावेळी नागरीकांना मास्क वापराचे महत्व सांगत जनजागृती केली.
WhatsApp-Image-2020-10-06-at-1.46.50-PM
ज्या नागरीकांच्या तोंडाला मास्क नाही अशाना आमदार अंबादास दानवेंनी स्वत: मास्क लावला. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे आणि सर्वात महत्वाचे घराबाहेर पडताना मास्क वापरत आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन अंबादास दानवे यांनी लोकांना केले.