आणि चक्क बॉर्डवर निकाह

1 min read

आणि चक्क बॉर्डवर निकाह

नियम कसेही करा ते मोडण्याची इच्छा आणि शक्ती भारतीयांच्या मध्ये आहे. निकाह नक्की होता. पोलीस परवानगी देत नव्हते. मग चक्क दोन राज्याच्या सिमेवर बाभळीच्या झाडाखाली निकाह लावण्यात आला

कोरोना नियं६णासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असताना लोक मात्र एकत्रित येऊन या प्रयत्नाला तिलांजली देत आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या सिमारेषेवर असाच एक प्रकार घडला. सीमा ओलांडण्याची परवानगी पोलीसांनी दिली नाही म्हणून दोन परिवारांनी मिळीन दोन्ही राज्याच्या सिमारेषेवरच निकाह लावला.
मध्यप्रदेशातील राजगड जिल्यातील सरंगपूर येथील तरूणाचा विवाह राजस्थानातील झलवार जिल्ह्यातील मनोहर येथील मुलीशी नक्की झाला. वराचे नाव सद्दाम तर वधुचे नाव झेबा असे आहे. डिसेबर महिण्यात या दोघांचा निकाह ठरला होता. आणि मार्चमधील तारिख ठरली होती. विशेष परवानगी काढून हा विवाह लावण्याचा दोन्ही परिवाराचा विचार होता. मात्र दोन्ही परिवाराला सिमा ओलांडून जाण्याची परवानगी प्रशासनाने दिली नाही. दोन्ही परिवाराला लग्नाची तारिख टळू द्यायची नव्हती तेव्हा त्यांनी काझीला सिमेवर बोलावून नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लाऊन टाकले.
बाभळीच्या झाडाखाली झालेल्या लग्नाला वातेवाईक हजर होते.