आरोग्य केंद्रात दारूच्या बाटल्या...!

1 min read

आरोग्य केंद्रात दारूच्या बाटल्या...!

जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांची किनगाव आरोग्य केंद्रास अचानक भेट.

अहमदपूर: अहमदपूर तालुक्यातील किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्याने संतापलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी नुकतीच किनगाव आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन केलेल्या पाहणीत कमालीची अस्वच्छता, सिगारेट-बिडीची थोटके, पान-सुपारीचे रंगकाम दिसून आले. याठिकाणी काही दारूच्या बाटल्याही अध्यक्ष केंद्रे यांनी शोधून काढल्या.
आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षापासून ते फार्मासिस्टची रूम, प्रसुतीगृह, औषध भांडार, जनरल वॉर्डच्या पाहणीत प्रत्येक कक्षाचे कोपरे, खिडक्या त्यांच्या पाठीमागे थुंकून लाल झालेल्या भिंती दिसून आल्या. काही कर्मचारी स्वाक्षरी करून निघून जातात अशा तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले. हालचाल रजिस्टर दोन महिन्यापासून खराब झाले असून फाटलेल्या अवस्थेत दिसून आले....!