अबब!! औरंगाबादेत ३२१ कोटींची पाणीपट्टी थकली..

1 min read

अबब!! औरंगाबादेत ३२१ कोटींची पाणीपट्टी थकली..

अशी आहे आकडेवारी

सुमित दंडुके /औरंगाबाद: काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला पाणीपट्टी वसूलीतही मोठा फटका बसला आहे. थकबाकीची एकूण रक्कम तब्बल ३२१ कोटीवर गेली आहे तर २०२०-२१ या आर्थिक वर्षांची ६१ कोटी रुपयांची मागणी आहे. यातील फक्त १३ कोटी रुपये आत्तापर्यंत वसूल झाले आहेत.

अशी आहे आकडेवारी :

निवासी नळ - १,१४,६२९
थकबाकी - २६४,९८,९२,५९२
चालू मागणी - ४९, १४,३७,७८२
एकूण - ३१४,१३,३०,३७४

व्यावसायीक नळ - १९२३
थकबाकी - ५६,५५,६५,५९९
चालू मागणी - ११,८०,३५,९५५
एकूण - ६८,३६,०१,५५४