अबब..! धनुषच्या या गाण्याला १ अब्ज व्ह्यूज

1 min read

अबब..! धनुषच्या या गाण्याला १ अब्ज व्ह्यूज

मारी २ या चित्रपटातल' रावडी बेबी" हे तामिळ गाणं सध्या चांगलंच प्रसिद्धीला येतंय. या गाण्याने १०० कोटी ह्युज चा टप्पा पार केला आहे.

साऊथचे सुपरहिट हिरो रजनिकांत यांचा जावई धनुष हा नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिकंतो. त्याच्या 'रंजना' या हिंदी चित्रपटाला देखील लोकांनी चांगलीच प्रसिद्धी दिली आहे. त्यासोबतच त्याचा मारी हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना भावतो. आता मारी २ या चित्रपटातल' रावडी बेबी" हे तामिळ गाणं सध्या चांगलंच प्रसिद्धीला येतंय. या गाण्याने १०० कोटी ह्युज चा टप्पा पार केला आहे.
dhanush-2
या गाण्यामध्ये तो अभिनेत्री साई पल्लवी सोबत डान्स करत आहे जे प्रेक्षकांच्या पसंतीचं कारण ठरत आहे. आपल्यावरचं प्रेम पाहून धनुष ने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत एक खास गोष्ट सांगितली आणि चाहत्यांचे आभारही मानले. तो म्हणाला "काय अनोखा योगायोग आहे 'राउडी बेबी' या गण्याला १०० कोटी ह्यूज मिळाले आहे. आणि याच दिवशी ९ वर्षांपूर्वी माझ्या 'वाय धिस कोलवरी डी' या गाण्याला चाहत्यांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला होता. हे पहिले दक्षिणात्य गाण आहे ज्याला यूट्यूब वर १०० कोटी व्ह्युज मिळाले आहे . यासाठी मी सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानतो."