अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

1 min read

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

मुंबईतल्या स्वत:च्या घरातील खोलीत गळफास घेऊन केली आत्महत्या

मुंबई: एम.एस धोनी, छिछोरे या सिनेमातून यशस्वी प्रवास करणारा सुप्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी मुंबईतल्या स्वत:च्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. नोकराने फोन करून दिली पोलिसांना घटनेची माहिती. पोलिस सुशांतच्या घरी पोहचले आहेत व पुढील तपास सुरु आहे.

पडद्यावरचा #एमएसधोनी आयुष्यातील खेळ मात्र धीराने खेळू शकला नाही. #छिछोरे चित्रपटात हाच सुशांत #आत्महत्या करू नये असे आपल्या मुलाला सांगत होता. हाच रील लाईफचे ज्ञान रियल लाईफ मध्ये आणू शकला नाही.
बांद्रा येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून सुशांतसिंह राजपूत गेला.
लोक कारणे शोधत आहेत पण अभिनय करताना तो जो लोकांना शिकवत होता तो ते स्वतः शिकू शकला नाही हेच दुर्दैव....