अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळाफास घेवुन आत्महत्या

पाच दिवसांपुर्वीच सुशांत सिंह राजपुतची माजी मॅनेजर दिशा सलियनची आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळाफास घेवुन आत्महत्या

स्वप्नील कुमावत/मुंबईः बॉलिवूड आभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. छोट्या पडद्यावरील मलिकांमध्ये काम कारत त्याने करिअरला सुरुवात केली होती. 2013 मध्ये ‘काइ पो छे’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. त्यानंतर एम एस धोनी, केदारनाथ छिछोरे, शुध्द देसी रोमान्स, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमीका साकारली होती.

काही दिवसांपुर्वी सुशांतने त्यांच्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने माँ असं लिहिलं होतं.

पाच दिवसांपुर्वीच सुशांत सिंह राजपुतची माजी मॅनेजर दिशा सलियनने 8 जूनला मुंबईती एका इमारतीवरुन उडी मारुन आत्मह्त्या केली होती. दिसाने मुंबईच्या मालाडमधील 14 मजली इमारतीवरून उडी मारली.

सुशांत आत्महत्या केली त्यावेळी त्याचे मित्र देखील घरात होते. सकाळी मित्रांनी आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला सुशांतचा मृतदेह आढळला. सुशांतच्या घरात काही कागदपत्रे देखील सापडली आहेत., ज्याद्वारे समजते की, तो नैराश्यावर उपचार करीत होता. काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, सुशांतचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध होते आणि सध्या या अफेयरमध्ये धुसफुस होती. सुशांत यामुळेही परेशान होता.

बॉलिवूडमधुन अक्षय कुमार, अजय देवगन, नवोझिद्दीन सिद्दीकी यांनी ट्विटच्या माध्यमातुन भावना व्यक्त केल्या आहे.

सुशांत सिंगची पार्श्र्वभूमी
सुशांत सिंग राजपूत मुळचा बिहारमधील पाटण्याचा. त्याचं कुटुंब बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातलं. आईच्य़ा निधानानंतर त्याने दिल्लीमध्ये शिक्षणासाठी येण्याचा निर्णय घेतला. अभिनयाच्या अवडीमुळे तो आपलं आभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकला नव्हता.

त्यानंतर त्याच्या कुटुंबानं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला 2008 साली ‘किस देस मे मेरी दिल’ नावाच्या मलिकेतून त्याची छोट्या पडदयावर एंट्री झाली. 2009 साली पवित्र रिश्ता मलिकेत मानव देशमुख ही भूमिका त्याला मिळाली आणि त्याच्या अभिनयातील करिअरला खरी गती मिळाली.
त्याने साकारलेला मानव देशमुख घराघरात पोहोचला. ‘जरा नचके दिखा’ आणि ‘झलक दिखलाजा’ या डान्स शोमधून त्यानं अपलं नृत्यकौशल्य सर्वांसमोर सादर केलं. तेव्हापासूनच त्याच्या अभिनयाच्या आणि नृत्यकौशल्याची चुणूक सर्वांना दिसुन आली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.