डीवायएसपी राठोडांच्या गाडीला अपघात

या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार पंडीत हे करीत आहेत.

डीवायएसपी राठोडांच्या गाडीला अपघात

परभणी : रात्रीच्या गस्तीसाठी निघालेल्या पोलिस उपअधीक्षक सुभाष राठोड यांच्या वाहनास पुर्णा तालुक्यातील नऱ्हापुर येथे शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात सुभाष राठोड यांच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांस जबर मार लागला आहे.

या प्रकरणी स्वतः सुभाष राठोड यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या अभियंत्यासह कंत्राटदाराविरोधात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुभाष राठोड यांच्याकडे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पूर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अतिरीक्त प्रभार दिला आहे. राठोड हे गुरुवारी रात्री चेकिंग ड्युटी करत होते. त्यावेळी ते पूर्णा ते चुडावा रस्त्यावरून नर्‍हापूर नालापुलाजवळून जात होते. त्यावेळी तेथे पुलाचे काम चालू असल्याने त्या कामाजवळ दिशादर्शक बोर्ड लावलेला नव्हता. किंवा रस्त्यावर दगडंही लावलेली नव्हती. त्यामुळे राठोड हे बिनदिक्कत तेथून जात होते. त्यावेळी त्यांना नेमका रस्ता लक्षात आला नाही, शिवाय समोरून येणार्‍या वाहनाचा उजेड चमकल्यामुळे राठोड यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची जीप क्र.एमएच १२ पीटी ५७१२ ही नादुरूस्त असलेल्या पुलाजवळ आदळली. यात जीपचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून आपल्यासह गाडीतील कर्मचारीही जखमी झाला असल्याचे त्यांनी चुडावा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार पंडीत हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.