जबाबदारीने वागा अन्यथा पुन्हा लागतील निर्बंध

मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांचे शहरातील जनतेला आवाहन...

जबाबदारीने वागा अन्यथा पुन्हा  लागतील निर्बंध

औरंगाबाद : राज्य सरकारने निर्बंध हटविण्यासाठी ५ टप्पे जाहीर केले आहेत. यामध्ये औरंगाबाद शहराचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्याने शहरातील सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काल दि.७ पासुन या अनलॉक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. आणि पहिल्याच दिवशी औरंगाबादकरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. यावर नाराजी व्यक्त करत मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.

पांडेय म्हणाले, 'शहरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. नागरिकांनी गाफिल न राहता जबाबदारीने वागावे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गुरुवारी पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये वाढ झाल्याचे दिसुन आल्यास शहरात पुन्हा निर्बंध लागू शकतात. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता नियमांचे पालन करावे आणि गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि शहराला पहिल्या टप्प्यातच ठेवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.'

औरंगाबादमध्ये बाजारपेठा सुरु, पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.