अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीवर कारवाई

IPC कलम 188 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीवर कारवाई

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीवर करण्यात आलेल्या कारवाईचे उदाहरण देत, अकारण फिरुन 'हिरोपंती' करु नका असा सल्ला मुंबईकरांना दिला आहे. "व्हायरस सोबतचे युद्ध अजुन संपलेले नाही. वांद्र्यामध्ये फिरणार्या दोन कलाकारांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. IPC कलम 188 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईकरांनी अनावश्यक हिरोपंती करु नये, असा सल्लाही पोलीसांनी दिला आहे."

दरम्यान अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बँडस्टँड परिसरात फिरत होते. विनाकारण फिरणार-या ईतर लाेकांप्रमाणेच या दोघांवरही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मुंबई पोलीसांनी त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केला आहे.

राज्यातील लॉकडाऊन शिथिल झल्यानंतर अनेक लोक त्याचा फायदा घेताना दिसत आहेत. याला बॉलिवुड सेलीब्रीटीही अपवाद नाहीत. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे लॉंगड्राईव्हसाठी बाहेर पडले असता पोलीसांनी त्यांना पकडले आणि त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणीही केली. अजून कोरोनाचे संकट पुर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्या शिथिलता दिली असली तरीही विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

घरघुती वादाचा शेवट केला पत्नीच्या खुनाने
कुऱ्हाडीने वार करुन केला पत्नीचा खुन, फुलंब्री तालुक्यातील गिरसावळी गावातील धक्कादायक घटना..

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.