लोकल प्रवासासाठी 500 रुपयात क्यूआर कोड बनविणाऱ्या टोळीवर कारवाई.

1 min read

लोकल प्रवासासाठी 500 रुपयात क्यूआर कोड बनविणाऱ्या टोळीवर कारवाई.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

मुंबई : कोरोना संकट पाहता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी 15 जूनपासून लोकल ट्रेन सुरु करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यां व्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये, म्हणून महाराष्ट्र सरकारने क्यूआर कोड सिस्टिम सुरु केली होती. याचाच फायदा घेत बोगस क्यूआर कोड बनवणारी टोळी सक्रिय झाली. काही जण खोटे ओळखपत्र बनवून प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली असून त्यांना अटक केली आहे.

एका नागरीकाने सरकारी कर्मचाऱ्याच्या वेषातील खोटा फोटो लावून खोटे ओळखपत्र बनवले आहे. फक्त रेल्वेतून प्रवास करता यावा म्हणून या व्यक्तीने हा उपदव्याप केला आणि खोटे ओळखपत्र बनवले.

लोकल प्रवासासाठी खोटा पास बनवल्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. तसेच ज्या व्यक्तींना त्याने पास बनवून दिले आहेत, त्यांनाही अटक करण्यात आली होती. या व्यक्तीने आतापर्यंत जवळपास 400 ते 500 फेक क्यूआर कोड लोकांना बनवून दिले आहेत.