मुंबई: अभिनेता समीर शर्मा याने मुंबईतल्या मालाड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. छोट्या पडद्यावरील मलिकांमध्ये काम कारत त्याने करिअरला सुरुवात केली होती. ‘कहाणी घर घर की’, ‘ सास भी कभी बहू थी’ या मालिकेमध्ये सुद्धा त्यांने काम केलं आहे.
दोन दिवसांपूर्वी घरातील फॅन ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांचा अंदाज आहे. घरातून वास येत होता.मध्ये जाऊन दार उघडलं तेव्हा समीर शर्मा यांनी आत्महत्या केल्याची माहिती वॉचमॅन ने पोलिसांना दिली.
