अभिनेता सुबोध भावे व परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण.

1 min read

अभिनेता सुबोध भावे व परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण.

सुबोधने स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली आहे.

मराठी अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण झाली आहे. सुबोधने स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली आहे. सुबोधसह त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या दुसऱ्या मुलाला मल्हारला मात्र कोरोनाची लागण झाली नाही. तिघांनीही स्वतःला घरीच विलगीकरण करून घेतलं आहे. ट्वीट मध्ये सुबोधने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आम्ही उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, असे आवाहनही सुबोधने केलं आहे.
‘गणपती बाप्पा मोरया.’