मुंबई: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी फिल्म अभिनेत्री पायल घोष, आपल्या वकिलासमवेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी लागू शकते वर्णी.
अभिनेत्री पायल घोष हिची आरपीआयच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केले जाऊ शकते. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर मीटूचा पायल घोष हिेने आरोप केला होता. यासंदर्भात मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, कश्यप यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
रामदास आठवलेंनी दिला होता पाठिंबा
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पायल घोषला मीटू प्रकरणात पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी अभिनेत्री पायल घोषची भेटही घेतली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी घोष यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. जिथे पायलने आपली सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली होती.