गुरुवारी दिवसभरात ४०० नव्या रुग्णांची भर

११ कोरोना बाधितांचा मृत्यू

गुरुवारी दिवसभरात ४०० नव्या रुग्णांची भर

परभणी: शहरासह जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवार, १ एप्रिल रोजी दिवसभरात ४०० नव्या रुग्णांची भर पडली. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात २२१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या सर्व रुग्णालयात मिळून २ हजार ५३५ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ४२३ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार ८५७ व्यक्ती कोरोना बाधीत झाले आहे. ११ हजार ८९९ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात १ लाख ७३ हजार २२३ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ५७ हजार ७८५ व्यक्ती कोरोनामुक्त आहेत. तर १४ हजार ७०४ नमुने पॉझिटीव्ह आले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी पसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.