आदित्य ठाकरेंच्या खात्याचे नाव बदलले, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

1 min read

आदित्य ठाकरेंच्या खात्याचे नाव बदलले, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

पर्यावरण विभागाचे नाव बदलून 'पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग ' असे नामकरण करण्यात आले.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारची राज्य मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे आज (दि. 9) रोजी बैठक पार पडली. या बैठकीत पर्यावरण विभागाचे नाव बदलून ' पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग ' असे करण्यात आले. वातावरणामध्ये सातत्याने होणारे बदल, पर्यावरण आदित्य ठाकरेंचा आवडीचा विषय आहे. त्यांच्या सूचनेनुसारच  या विभागाचे नामकरण करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय

  1. चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर.
  2. पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून ते ' पर्यावरण व वातावरणीय विभाग ' असे करण्यास मान्यता.
  3. कौटुंबिक  न्यायालयांना पुढील 5 वर्षाचा कालावधीसाठी मंजुरी.
    4)ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्याना कर्ज उभारणीसाठी शासन हमी.
  4. मोजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटनासाठी ताज ग्रुप ला भाडेपट्याने जमीन.