अदित्यच्या घरी लगीन घाई.

1 min read

अदित्यच्या घरी लगीन घाई.

आदित्य लवकरच प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता आदित्य नारायण याच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. नुकताच आदित्य आणि श्वेताचा रोका समारंभ पार पडला आला. आदित्यच्या एका फॅन पेजवर या दोघांच्या रोका समारंभाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
IMG-20201106-WA0004
आदित्य लवकरच प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यने सोशल मीडियावर श्वेतासोबत असलेल्या नात्यावर कबुली दिली होती. त्यानंतर आता या दोघांच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. विशेष म्हणजे लग्नाची तयारी करण्यासाठी आदित्यने काही काळ सोशल मीडियापासून लांब राहण्याचं देखील ठरवलं आहे.