सोनपेठच्या प्रतिबंधित क्षेत्राची प्रशासनाकडून पाहणी.

1 min read

सोनपेठच्या प्रतिबंधित क्षेत्राची प्रशासनाकडून पाहणी.

तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कोरोनाच्या काळात महत्वाची भूमिका बजावली असून इतर तालुक्याच्या तुलनेत सोनपेठमध्ये रुग्णसंख्या वाढू दिलेली नाही.

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ: सोनपेठ तालुक्यात कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दक्षता ठेऊन कोरोनाला हरवण्यासाठी सतर्कता घेतली जात असून. तालुक्यात आणि शहरात असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्राची प्रशासनाकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कोरोनाच्या काळात महत्वाची भूमिका बजावली असून इतर तालुक्याच्या तुलनेत सोनपेठमध्ये रुग्णसंख्या वाढू दिलेली नाही.
यासाठी प्रशासनाने गावपातळीवर जाऊन ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण आहे, अशा कुटुंबासाठी सुरक्षिततेची वेगळी सूची तयार करून यात कोरोना वाढणार नाही.याची दक्षता घेण्यात आली होती.नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाच्या हाकेला साथ देत कोरोनाला हरवण्यासाठी साथ दिली.
या पार्श्वभूमीवर कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्राबाबत आदेश लागू करणे या अधिकारानुसार तहसीलदार डॉ.बिरादार यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आहे.
नुकतेच शहरातील व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी,बीटअंमलदार आत्माराम पवार,मंडळ अधिकारी वाणी आदींनी, सोनपेठ तालुक्यातील तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी. त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना कोरोनाला हरवण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.