कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- अजित पवार

तिसऱ्या लाटेत ३० च्या आतील वयोगटातील नागरिक तसेच बालके बाधित होण्याची शक्यता व्यक्

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- अजित पवार

राज्य : कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जातांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून आरोग्याची काळजी घेण्याचे भान कोरोनामुळे आपणास आले आहे. कोरोनाच्या संकटाला सामोरे जावून त्यावर मात करण्याकामी प्रशासनाच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या नियमित उपस्थितीवर लक्ष केंद्रीत करून दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था होईल याचे नियोजन करण्यात यावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य व पोलिस विभागांनी मनुष्यबळ उपलब्धतेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. कोरोनाचा हा काळ अतिशय बिकट असल्याने ग्रामीण भागात सेवा देतांना मानवतेच्या भावनेतून शासकीय डॉक्टरांनी काम करावे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरीकांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेत ३० ते ६० वयोगटातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करता संभाव्य तिसऱ्या लाटेत ३० च्या आतील वयोगटातील नागरिक तसेच बालके बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादृष्टिने प्रत्येक तालुकास्तरावर बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांवर पोलिस विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.