जाहीरात भाजपची अन् फोटो कॉग्रेस नेत्यांच्या सुनबाईचा

तमिळनाडू भाजपकडून प्रचारासाठी कॉग्रेस नेते पी.चिदंबरम यांच्या सुनबाई व कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम यांच्या फोटोचा वापर

जाहीरात भाजपची अन् फोटो कॉग्रेस नेत्यांच्या सुनबाईचा

देशात पाच राज्यांत निवडणूका होत आहेत. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र याच प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये भाजपकडून तमिळनाडू मध्ये प्रचारात गफलत झाल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूत 6 एप्रिलला मतदान होत आहे. 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. अण्णाद्रमुकबरोबर युती करून यावेळच्या निवडणुकीतही भाजप आपले नशीब आजमावत आहे. त्याच दरम्यान, भाजपकडून तामिळनाडू मधील प्रचारात मोठी गफलत झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?
भाजपाच्या तामिळनाडू युनिटने ट्विटरवर प्रचाराशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ तमिळनाडूच्या संस्कृतीशी संबंधित होता.या व्हिडिओ मध्ये एक महिला कलाकार दाखविण्यात आली आहे. मात्र ती महिला कलाकार कॉग्रेस नेते पी.चिदंबरम यांच्या सुनबाई व कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम असल्याचं उघडकीस आल्यानंतर भाजपने आपल्या ट्विटर अकाउंटवरून संबंधित व्हिडिओ तात्काळ काढला.
(The BJP immediately removed the video from its Twitter account after it was revealed that it was Srinidhi Chidambaram, the daughter-in-law of Congress leader P. Chidambaram and wife of Congress MP Karti Chidambaram.)

दुसरीकडे,तामिळनाडू कॉंग्रेसने ट्विट करत, भाजपाने त्यांच्या परवानगीशिवाय श्रीनिधींचे चित्र वापरले असल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनीही ट्विटरवर ही माहिती शेअर केली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिदंबरम एक कलाकार तसेच वैद्यकीय व्यावसायिक देखील आहेत. मात्र हा व्हिडीओ भाजपसाठी डोकेदुखी झाला आहे. यावर विरोधकांकडून भाजपला चांगलच ट्रोल केलं जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.